Proposed program & Budget

ग्रामीण विकास लोक संस्था (PIRD)
कराड नगर, नांदेड रोड, अहमदपूर, जि. लातूर – ४१३५१५

निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून बालीका विकास कार्यक्रम

ज्या भागातील शिक्षणाच्या प्रवासात मुलींच्या होणार्याज एकूण शाळा गळतीपैकी ५०% ची गळती माध्यमिक शिक्षणाच्या स्तरावर होते, आणि ३०% मुलींचे बालविवाह होतात, आणि जिथे ० ते ६ वयोगटील मुलींचे प्रमाण हजारी ८६४ आहे, अशा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका परिसरात “ ग्रामीण विकास लोक संस्था (PIRD)” नियोजित ‘ निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून बालीका विकास ’ प्रकल्प कार्यान्वीत करु इच्छीते.
प्रकल्प उद्देश :
१. किशोरी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित करणे आणि त्यांची शिक्षणातील निरंतरता कायम रहावी यासाठी प्रयत्न करणे.
२. किशोरी मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी त्यांच्यात जीवन कौशल्ये रुजविणे.
३. बालीका विवाहास प्रतिबंध होईल, अशी वातावरण निर्मिती करणे
लक्ष गट : वय वर्षे १२ ते १८ वयोगटातील किशोरी मुलीं आणि त्यांचे पालक.
प्रकल्प पार्श्वभूमि आणि समस्या :
सन २००५ साली आम्ही आमच्या “ बालमजूरी निर्मूलन आणि शिक्षण “ कार्यक्रमाचा आढावा घेत असतांना आमच्या असे लक्षात आले की, शालाबाह्य असलेल्या ज्या १७९ मुलींना इयत्ता ४ थी च्या परिक्षेस बसविलेले होते, पैकी १०५ मुलीं नंतर शाळेत गेल्याच नाहीत, त्यांचे वय वर्षे १३ ते १६ या दरम्यान विवाह होऊन गेलेले होते. अधिक अभ्यास केला असता, “ २००२ मानव विकास अहवाल – महाराष्ट्र शासन “ यात पण लातूर जिल्ह्यातील बालीका विवाहाचे प्रमाण ५८ % असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. हा तर अतिशय गंभीर प्रश्न आहे, ज्यामुळे शेकडो मुली शिक्षणापासून वंचित होत होत्या आणि त्यांच्यावर सक्तीची समाजमान्य वेठबिगारी पण लादली जाते आहे, हे लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशन च्या साह्याने “ बालीका विवाह प्रतिबंध “ कार्यक्रम २००६ ते २०१२ या कालावधित चालविला. या कार्यक्रमातून १००% अपेक्षित उद्दीष्ट प्राप्त झाले नसले तरी बालीका विवाहाचे प्रमाण ५७ वरचे ३० टक्क्यावर आलेले होते, एवढच समाधान.

जनगणनेच्या नोंदीनुसार अहमदपूर ग्रामीण साक्षरतेचे प्रमाण ७७.२७ तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण ६६.५१ असे आहे, म्हणजेच किमान ३३% ग्रामीण स्त्रीया निरक्षरच आहेत. अहमदपूर ब्लाकमध्ये एकूण १२३ गावे असून यापैकी ५० गावातून माध्यमिक आणि ९९ गावातून एस एस सी च्या शिक्षणाची सोय नाही,

आवश्यकतेनुसार माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसणे, चिंताजनक शाळा गळती असणे, पालकांच्या आर्थिक दुर्बलतेमुळे मुलींच्या शिक्षणाची आबाळ होणे, उपवर मुलींच्या बाबतीत असुरक्षतेची भावना असणे, आणि या सर्वांचा परिपाक म्हणून ३०% मुलींचे बालविवाह होणे या बाबी हे दर्शवितात की, “ लातूर जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाबाबतची परिस्थिती चिंताजनक आहे.

नियोजित मुख्य कार्यक्रम:
१. गावस्तरावर जाणीव-जागृती कार्यक्रम
२. किशोरीसाठी जीवन कौशल्य शिक्षण.
३. सिंगल आणि अति दुर्बल पालकांच्या मुलींना भरीव साह्य.
४. शालेय अभ्यासाकरिता मल्टीमिडियाचा वापर.
५. सर्वसाधारण शिक्षण प्रोत्साहन कार्यक्रम
प्रकल्प कालावधि : १ वर्ष
प्रकल्प बजेट (एक वर्षाकरिता):
अ. क्र. अपेक्षित खर्च तपशील रक्कम रु.
जाणीव – जागृती कार्यक्रम खर्च
प्रति कार्यक्रम रु. ३०००/- प्रमाणे १५ गावे ४५,०००
२ कौटुंबिक समस्याग्रस्त पालकांच्या किशोरी मुलींना शैक्षणिक साह्य,प्रति किशोरी रु. २५००/- ते ५०००/- प्रमाणे, एकूण ६० मुलींसाठी रु. २,००,०००/-
व्हीडीओ च्या माध्यमातून शिक्षण
डीव्हीडी प्लेअर आणि अभ्यासक्रम सीडी तसेच ब्लॅंक सीडी खरेदी इ. प्रति किशोरी मंडळ रु.१०,००० प्रमाणे १५ युनिट १,५०,०००
सर्वसाधरण शिक्षण प्रोत्साहन कार्यक्रम,
प्रति गावाकरिता, रु. १२,०००/- प्रमाणे १५ गावाकरिता १,८०,०००
प्रकल्प व्यवस्थापन:
१.प्रकल्प समन्वयक वार्षीक मानधन: रु. १,४४,०००/-
२.कार्यकर्ता-२, प्रत्येकी वार्षीक रु. १,२०,०००/- प्रमाणे, रु. २,४०.०००
३.प्रकल्पासाठी स्टेशनरी, फोन, वीजबील, व अन्य किरकोळ खर्च द. म. रु. ५,०००/ प्रमाणे, रु. ६०,०००
४. प्रवास खर्च दम. रु. ३,०००/- प्रमाणे रु, ३६,०००/-
एकूण बजेट रु. १०,५५,०००/-

देणगीसाी येथे क्लीक करा

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s